Latest

नगरकरांनो बदलतेय भिस्तबाग महालाचे स्वरूप, ‘असा’असेल विकसित महाल..

नगरकरांनो, अहिल्यानगरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा भिस्तबाग महाल आता नव्या रूपात झळकणार आहे. सावेडी उपनगरातील हा ऐतिहासिक महाल केवळ जुन्या आठवणींचा वारसा राहणार नाही, तर भविष्यात शहरातील एक प्रमुख पर्यटन आणि विरंगुळ्याचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

मंडळी, भिस्तबाग महाल निजामशाही काळात इ.स. १५०६ मध्ये अहमद निजामशाह यांनी बांधला होता. आता या परिसराचे रूपडे पूर्णपणे बदलत आहे. पर्यटन विकास निधीतून सुमारे दीड कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून महालाभोवती दगडी संरक्षक भिंत उभारली जात आहे. चार ठिकाणी छोटे बुरुज उभारले जात आहेत.

संपूर्ण परिसरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार केले जात असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही केले जात आहे. याशिवाय नागरिकांसाठी सुसज्ज जॉगिंग ट्रॅक तयार केला जात आहे.

आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे येत्या १५ ऑगस्टला भिस्तबाग महाल परिसरात तब्बल ३०० फूट उंचीचा भव्य तिरंगा ध्वज उभारला जाणार आहे. त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे येथे इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम येथे पाहायला मिळणार आहे.

मंडळी, भिस्तबाग महालाचा हा कायापालट अहिल्यानगरच्या पर्यटन आणि सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा देणारा ठरू शकतो. तुमचे मत काय आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button