Latest

काम विखेंचं आणि फोटोसेशन दुसऱ्यांचचं ? नगरच्या उड्डाणपुलावरून राजकारण तापलं !

अहिल्यानगरमधील सीना नदीवरील उड्डाणपूलाचे काम सुरू होताच आता या कामाच्या श्रेयासाठी राजकीय स्पर्धा पण सुरू झाली आहे. यामुळे नगरमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे.

मंडळी नगरसेवक महेश लोंढे यांनी नाव न घेता खासदार नीलेश लंके यांच्यावर टीका करत, “काम दुसऱ्यांचं आणि फोटोसेशन दुसऱ्यांचं” असा टोला लगावलाय. खरेतर, कल्याण रोडवरील अमरधाम परिसरातील सीना नदीवरील उड्डाणपुलावर स्लॅब टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक दत्ता गाडळकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, हा पूल माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झाला आहे. तसेच संग्राम जगताप यांनीही या कामासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुलाच्या कामामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीचा मोठा प्रश्न सुटणार असला तरी आता या प्रकल्पाच्या श्रेयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मग मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं ? हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button