Latest

नगरकरांनो! तुमच्या भागातले मोकाट कुत्रे आता ‘या’ आलिशान केंद्रात जाणार; महापालिका वर्षाला करणार 1 कोटी रुपये खर्च…

महानगरपालिकेने पिंपळगाव माळवी येथे ५०० कुत्र्यांच्या क्षमतेचे भव्य ‘श्वान निवारा केंद्र’ (सेंट्रल डॉग शेल्टर होम) उभारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि प्राणी कल्याण मंडळाच्या नियमांनुसार हे केंद्र अद्ययावत व सुरक्षित शेडसह तयार करण्यात आले आहे.

शहरात सध्या सुमारे २५ हजार मोकाट कुत्री असून, शाळा आणि हॉस्पिटल परिसरातील कुत्र्यांना प्राधान्याने या केंद्रात हलवले जाईल. तर रहिवासी भागातील कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण मोहीम सुरूच राहील.

या प्रकल्पाची जबाबदारी ‘क्षितिज’ संस्थेला देण्यात आली असून, तिथे पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक, योग्य अन्न-पाणी आणि आरोग्याची काळजी घेणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी मनपा फंडातून दरमहा सुमारे पावणे नऊ लाख, म्हणजेच वर्षाला तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामुळे मनपाच्या तिजोरीवर बोजा पडणार असला, तरी नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button