
तुम्ही नवीन दुचाकी खरेदी करताय आणि गाडीचा नंबरही तुमच्या पसंतीचा हवा आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!
मंडळी, अहिल्यानगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकींसाठी नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे.
या मालिकेत तुम्हाला 0001, 9999 किंवा तुमच्या आवडीचा विशेष क्रमांक मिळवण्याची संधी आहे. यासाठी इच्छुक वाहनधारकांनी गुरुवार, १२ नोव्हेंबरपर्यंत चांदणी चौकातील आरटीओ कार्यालयात खिडकी क्रमांक १४ येथे विहित शुल्कासह अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट जमा करायचा आहे.
विशेष म्हणजे, एका क्रमांकासाठी एकच अर्ज आल्यास तो क्रमांक संबंधित अर्जदाराला मिळेल. मात्र, एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास शुक्रवारी, १३ नोव्हेंबरला बंद लिफाफ्यातून लिलाव होणार आहे.
अर्जदारांची यादी गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. तर मग मंडळी तुम्ही कधी घेताय तुमचा लकी नंबर? कमेंट करून नक्की सांगा.





