Latest

शेतकऱ्यांना दिलासा ! अहिल्यानगरच्या ‘या’ बाजार समितीत कांद्याला 2600 रुपये क्विंटलचा भाव

अहिल्यानगर मधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांद्याच्या दरात चांगली वाढ पाहायला मिळाली. बाजारात कांद्याची तब्बल 10 हजार 344 गोण्यांची आवक झाली असून, उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल 2600 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

बाजार समितीच्या माहितीनुसार, नंबर 1 कांद्याला 2000 ते 2600 रुपये, नंबर 2 कांद्याला 1300 ते 1950 रुपये, तर नंबर 3 कांद्याला 600 ते 1250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गोल्टी कांद्याला 500 ते 1300 रुपये आणि जोड कांद्याला 400 ते 700 रुपये दर मिळाला.

कांद्यासोबतच डाळिंबालाही चांगला प्रतिसाद मिळाला. डाळिंबाच्या 1370 कॅरेटची आवक झाली असून, उत्कृष्ट दर्जाच्या डाळिंबाला 111 ते 300 रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळाला. याशिवाय गव्हाला सरासरी 2250 रुपये प्रतिक्विंटल, तर बाजरीला सरासरी 1900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळात आवक आणि बाजारभाव कसे राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button