Latest

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंचा यू-टर्न ! उमेदवारी न भरण्याचा निर्णय का घेतला?

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या माघारीमागे नेमकं काय घडलं, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या अपत्याची अट लागू आहे. याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर शिंदे यांनी कायद्यात अडचण असली तरी नियमानुसार निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, शिंदे यांच्यासाठी तिसऱ्या अपत्याची अट रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत असा कोणताही अध्यादेश निघाला नाही.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिंदे यांनी स्वतःहून उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता प्रश्न एकच—शिंदेंच्या माघारीमागचं नेमकं कारण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button