Latest

पावसाची चिंता मिटली ! महाराष्ट्रात सलग आठ दिवस मुसळधार पाऊस, नदी-नाले एक होणार ; पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहून थकला आहात ? मग तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. खरेतर, जून महिना संपत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

मान्सून राज्यात दाखल झाला खरा, पण त्याची वाटचाल अचानक मंदावल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र आता भारतीय हवामान विभागासोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, 21 जूनपासून 30 जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

हा पाऊस एकाच वेळी सर्वत्र पडणार नसला तरी विदर्भातून सुरुवात होऊन मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्याने सक्रिय होणार आहे. डख यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.

जमिनीत पुरेशी ओल नसताना पेरणीची घाई करू नका. शेतातील ओल व्यवस्थित तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या. तसेच यंदा दुष्काळाची भीती नसून परतीचा पाऊसही चांगला होईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. तर मग मंडळी तुमच्या भागात पाऊस सुरू झालाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button