Latest

ऊस तोडीला ‘ब्रेक’ लावा ! शेतकऱ्यांच्या ऊसाला या महिन्यात मिळू शकतो ५ हजाराचा भाव ? ३ कारणामुळे भाव तेजीत राहतील ! तज्ज्ञांचा अंदाज

शेतकऱ्यांनी यंदा ऊस तोडीची घाई केली तर नुकसान होऊ शकतं ! पण थोडं थांबलात तर टनाला ५ हजार मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण संभाव्य भाववाढीची प्रमुख कारणे कोणती?

तर मंडळी, यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाची परिस्थिती प्रतिकूल राहिल्याने उसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचं उत्पादनही कमी होऊ शकतं. त्यातच साखरेचे दर वाढण्याची शक्यता असल्याने उसाला चांगला भाव मिळण्याची संधी निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

शेतकऱ्यांनी लगेच ऊस तोडण्याची घाई न करता काही काळ थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डिसेंबरनंतर तोडणी केल्यास उसाचं वजन वाढू शकतं आणि त्यातून अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन कमी, खर्च मात्र मोठा अशी परिस्थिती आहे.

त्यामुळे ऊस उत्पादकांना योग्य दर मिळणं गरजेचं असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. काही तज्ज्ञांच्या मते, मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा कमी राहिल्यास उसाचा दर टनाला ५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र हा निश्चित दर नसून बाजारातील परिस्थितीवर तो अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button