Latest

पालकांनो सावधान ! राहुरीत घरात एकटी असलेल्या १७ वर्षीय मुलीचं अपहरण; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

आई-वडील कामावर गेले… संध्याकाळी घरी परतले, पण घरात मुलगी नव्हती ! पुढे समोर आलेली घटना धक्कादायक आहे.
मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी सकाळी मुलीचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यावेळी मुलगी घरात एकटी होती. मात्र संध्याकाळी ते घरी परतले असता मुलगी घरात नव्हती.

सुरुवातीला त्यांनी परिसरात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, पण तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास सुरू केला असून मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत. या घटनेमुळे राहुरी परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button