Latest

कांद्याचे भाव कोसळले; शेतकरी हवालदिल, मजुरीही निघेना..

मंडळी, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कांद्याचे भाव एवढे कोसळले आहेत की, शेतकऱ्यांना मजुरीही निघत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मंडळी, सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. पण एकीकडे कडक उन्हाळा आणि दुसरीकडे बाजारात घसरलेले भाव यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

मागील वर्षी लाल कांद्याला काही दिवसांसाठी चांगला भाव मिळाला होता. त्याच आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड वाढवली. पण यंदा उत्पादन विक्रमी झाले आणि बाजारात आवक वाढली आणि भाव कोसळले. काही शेतकऱ्यांनी उभ्या कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला कारण काढणीचा खर्चसुद्धा निघत नाही, अशी वेळ आली.

पूर्वी एखाद्या गावात १० ते २० कांद्याच्या चाळी दिसायच्या पण आता मोठ्या प्रमाणात साठा वाढल्याने सर्वत्र कांद्याच्या चाळी दिसत आहेत. या वाढलेल्या साठ्यामुळे बाजारात पुरवठा वाढत गेला आणि भाव आणखी घसरले.

जानेवारीपासूनच बाजारात कांदा उपलब्ध राहिला, त्यामुळे लाल कांद्याचे दर खाली आले. आणि आता मार्चपासून उन्हाळी कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने परिस्थिती आणखी बिघडली आहे.

आता मोठा प्रश्न असा आहे की, सरकार या परिस्थितीत काय उपाययोजना करणार? तुम्हालाकाय वाटत ? सरकारने काय करायला हवे? कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button