
कांद्याला तब्बल १४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय… पण हा भाव कोणत्या दर्जाच्या कांद्याला मिळतोय आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? पाहा हा पूर्ण रिपोर्ट…पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावाला दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे.
बुधवारी बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली असतानाही दर्जेदार कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.बाजार समितीच्या मुख्य आवारात तब्बल १५ हजार २४२ गोणी कांद्याची आवक झाली. या दिवशी झालेल्या लिलावात एकूण ८ हजार १८५ क्विंटल कांद्याची विक्री झाली.
उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याला प्रति क्विंटल १४०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.दराच्या बाबतीत विविध दर्जानुसार फरक दिसून आला. उत्कृष्ट ५ ते १० वक्कल कांद्याला १३०० ते १४०० रुपये दर मिळाला, तर नंबर १ कांद्याला ११०० ते १२०० रुपये भाव मिळाला.
मध्यम दर्जाच्या म्हणजेच नंबर २ कांद्याला ८०० ते १००० रुपये दर मिळाला, तर नंबर ३ कांदा ६०० ते ७०० रुपयांनी विकला गेला. कमी दर्जाच्या कांद्याला २०० ते ५०० रुपये दर मिळाला असून गोलटा व गोल्टी कांद्याला ५०० ते १००० रुपयांदरम्यान भाव मिळाल्याचे दिसून आले.आज तुम्हाला कांद्याला किती भाव मिळाला? कमेंटमध्ये नक्की सांगा





