
एकेकाळी ‘केसावर फुगे’ मिळायचे, पण आता हेच केस तुमच्यासाठी मोठा पैसा कमावून देऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का? मंडळी, आज केस हा फक्त कचरा राहिलेला नाही तर तो एक मोठा जागतिक व्यवसाय बनला आहे. काही ठिकाणी केसांना तब्बल ३०० रुपये प्रति २५ ग्रॅम असा दर मिळतो… म्हणजेच किलोला जवळपास १० हजार रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते.
नैसर्गिक केसांपासून बनवलेल्या विगला जगभरात मोठी मागणी आहे. विशेषतः भारतीय केसांची गुणवत्ता उत्तम मानली जाते. कारण हे केस मजबूत, नैसर्गिक आणि लवचीक असतात.
हे केस प्रक्रिया करून परदेशात पाठवले जातात. फॅशन इंडस्ट्री, चित्रपट सृष्टी आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्यांचे केस गळतात, अशा लोकांसाठी या केसांपासून विग तयार केल्या जातात.
या विग अगदी नैसर्गिक केसांसारख्या दिसतात. त्यांना स्ट्रेटनिंग, कर्लिंग सगळं करता येतं आणि त्या जास्त काळ टिकतात. त्यामुळे त्यांची किंमतही खूप जास्त असते.मंडळी, ही माहिती अनेकांना माहिती नसते,.. त्यामुळे हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा. लाईक करा..





