Latest

अहिल्यानगर जिल्हा बँकेत नवं समीकरण ! निवडणुकीत ५०१ महिला मतदार ! अध्यक्षपदावर संधी मिळणार का ?

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची अंतिम मतदारयादी जाहीर झाली आहे. एकूण ३ हजार ८३६ मतदारांमध्ये तब्बल ५०१ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

महिलांसाठी संचालकपदाच्या दोन जागा राखीव आहेत. यापूर्वी अनुराधा नागवडे आणि आशा तापकीर यांना या जागांवर संधी मिळाली होती. यावेळी मात्र महिला मतदारांची संख्या वाढल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावरही महिलांना संधी मिळणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

या मतदारयादीत आमदार मोनिका राजळे, शालिनी विखे पाटील, अनुराधा नागवडे यांच्यासह विविध राजकीय कुटुंबांतील महिला मतदारांचा समावेश आहे. काही ठिकाणी पती-पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यही मतदार झाले आहेत.

तालुकानिहाय पाहता कोपरगावमध्ये सर्वाधिक ७३ महिला मतदार आहेत. त्यानंतर श्रीगोंदा ५६, राहाता ५० आणि नगर ४९ असा क्रम आहे. आता प्रश्न एकच—जिल्हा बँकेच्या सत्तेच्या समीकरणात या ५०१ महिला मतदारांची भूमिका किती निर्णायक ठरणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button