Latest

जिल्हा बँक निवडणुकीत मोनिका राजळेंची ताकद कायम ! ढाकणे कुटुंबातील तिघांचेही ठराव मंजूर

पाथर्डीच्या सहकार राजकारणात पुन्हा एकदा आमदार मोनिका राजळेंचाच दबदबा दिसतोय का? तर मंडळी, पाथर्डी तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. सेवा संस्थांचे ८४ पैकी ६३ ठराव आतापर्यंत मंजूर झाले आहेत.

विद्यमान संचालक आणि आमदार मोनिका राजळे यांचा कासार पिंपळगाव तसेच पाथर्डी खरेदी-विक्री संघातूनही ठराव मंजूर झाला आहे. तालुक्याच्या सहकार क्षेत्रात त्यांचे मजबूत संघटन आणि प्रभाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड. प्रताप ढाकणे, त्यांचे पुत्र ऋषिकेश ढाकणे आणि चुलत बंधू अनिल ढाकणे यांचेही ठराव मंजूर झाले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय समीकरणांकडेही सर्वांचे लक्ष आहे. आता अंतिम पॅनल कसे तयार होणार आणि या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button