Latest

अहिल्यानगरच्या महेश शेळकेंचा हिंगोलीत खून; इंडियन ऑइलच्या सेल्स मॅनेजरसोबत नेमक काय घडलं ?

अहिल्यानगरच्या ३७ वर्षीय महेश शेळके यांचा हिंगोली जिल्ह्यात भरदिवसा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वसमत तालुक्यातील आंबाचोंडी फाट्यावर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप गेल्या चार महिन्यांपासून बंद होता.

या पंपावर कारवाई करत सील ठोकण्यासाठी इंडियन ऑइलचे सेल्स मॅनेजर महेश अण्णाराव शेळके आपल्या पथकासह मंगळवारी घटनास्थळी पोहोचले होते.

कारवाई सुरू असतानाच पंपचालकाचा मुलगा उमेश पांडववीर आणि महेश शेळके यांच्यात वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले.

उमेशने धारदार शस्त्राने महेश शेळके यांच्यावर तब्बल तीन ते चार वार केल्याची माहिती आहे. गंभीर जखमी झालेल्या महेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी पसार झाला असून कुरंदा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ठसेतज्ज्ञांकडून पंचनामा, तर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. अहिल्यानगरच्या तळेगाव येथील सेल्स मॅनेजरचा हिंगोलीत असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button