
1 जूनपासून तुमचं LPG गॅस कनेक्शन बंद होऊ शकतं? ‘एक घर, एक कनेक्शन’ नियमाबाबत मोठी चर्चा सुरू असून लाखो ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
माहितीनुसार, ज्या घरांमध्ये आधीच PNG म्हणजेच पाइपद्वारे नैसर्गिक गॅसची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी LPG सिलेंडर कनेक्शनवर निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार आणि तेल कंपन्या गॅस वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
‘एक घर, एक कनेक्शन’ या संकल्पनेनुसार एकाच पत्त्यावर PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन ठेवण्यावर मर्यादा आणल्या जाऊ शकतात. यामागचा उद्देश घरगुती गॅसचा गैरवापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखणे हा असल्याचं म्हटलं जात आहे.
याशिवाय PNG सुविधा असलेल्या भागांमध्ये LPG सिलेंडर बुकिंग आणि रिफिल प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. सिटी गॅस आणि तेल कंपन्यांचा डेटा एकत्र केल्याने अशा ग्राहकांची ओळख पटवली जात असल्याची चर्चा आहे.





