
घसा वारंवार दुखतोय? आवाज सतत घोगरा होतोय? मग हे फक्त साधे इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करू नका! घशाच्या कर्करोगाची सुरुवात काही सामान्य वाटणाऱ्या लक्षणांपासून होऊ शकते.
घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे, अन्न गिळताना त्रास होणे, दीर्घकाळ खोकला, खोकल्यातून रक्त येणे किंवा आवाजात सतत बदल होणे ही त्यापैकी काही लक्षणे आहेत.
कारण नसताना वजन कमी होणे किंवा कानात वेदना होणेही काही वेळा संकेत ठरू शकतात. ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असतील, तर स्वतःहून उपचार करण्याऐवजी ENT तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांमध्ये घशाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करणे महत्त्वाचे आहे. शरीर देत असलेल्या संकेतांना गांभीर्याने घ्या!





