Latest

15 ऑगस्टला भंडारदऱ्याला चालले? वाहतुकीत बदल, नक्की पहा..

15 ऑगस्टला भंडारदऱ्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यंदा स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीला भंडारदरा परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

या परिसरातील काही रस्ते अरुंद आहेत आणि काही ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

रंधा फाटा येथून भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेंडी आणि भंडारदरा येथे जाणाऱ्या वाहनांना वाकी फाटा आणि वारंघुशी फाटा येथून प्रवेश देण्यात येणार आहे.

तसेच या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. वारंघुशी फाटा किंवा वाकी फाट्यावरून प्रवेश केल्यानंतर चिचोंडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी, भंडारदरा धरण स्पिल्वे गेट, भंडारदरा गाव आणि त्यानंतर गुहीरे-रंधा मार्गे पर्यटकांना आपल्या इच्छित ठिकाणी जाता येणार आहे.

हा वाहतूक बदल 15 आणि 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button