Latest

एका क्षणात झालं होत्याच नव्हतं… भावाच्या अंत्यविधीला आलेल्या बहिणीचाही मृत्यू; राहुरीत नेमकं घडलं काय?

राहुरी शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावाच्या निधनानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीचाही काही तासांत मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमक प्रकरण काय? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.

मंडळी, राहुरी शहरातील बुवासिद्ध बाबा गल्ली येथे राहणारे अनिल विश्वनाथ फंड (वय ५६) यांचे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. भावाच्या निधनाची बातमी समजताच श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथे राहणाऱ्या त्यांची लहान बहिण सविता बापूसाहेब राऊत (वय ४७) या अंत्यविधीसाठी राहुरीला आल्या.

मात्र, भावाच्या निधनाचे दुःख त्यांना सहन झाले नाही. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना राहुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलविण्यात आले.

मात्र, शनिवारी सकाळी नऊ वाजता उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील भाऊ आणि बहिणीच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे. तर मग मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button