Latest

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल… जुने सर्व नियम झालेत रद्द, नवे नियम कसे आहेत?

एटीएममधून पैसे काढताना आता काही महत्त्वाचे नियम समोर आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २७ नोव्हेंबर रोजी नवे परिपत्रक जारी करत यासंदर्भातील जुनी १७ परिपत्रके रद्द केली आहेत. पण यामुळे मोफत व्यवहारांची मर्यादा बदललेली नाही. नवे नियम नेमके कसे आहेत? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी नव्या निर्देशांनुसार, बँकांना ग्राहकांना महिन्याला किती मोफत एटीएम व्यवहार करता येतील आणि मर्यादा संपल्यानंतर किती शुल्क आकारले जाईल, याची स्पष्ट माहिती द्यावी लागणार आहे. एटीएमबाहेरही यासंबंधीचे फलक लावावे लागतील.

स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला ५ व्यवहार मोफत आहेत. इतर बँकांच्या एटीएममधून मेट्रो शहरांत ३, तर नॉन-मेट्रो शहरांत ५ व्यवहार मोफत मिळतात. मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी २३ रुपये आणि त्यावर जीएसटी आकारला जाईल.

मात्र अयशस्वी व्यवहारासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. तर मग मंडळी तुमच्या मते एटीएम व्यवहारांवरील शुल्क योग्य आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button