
दिवाळी गेली, भाऊबीजही झाली, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही आले नाहीत ! ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही हप्ते अद्याप रखडले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत आहे.
मात्र, आता या हफ्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काय आहे नवीन अपडेट? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, सरकारकडून दर महिन्याला मिळणारे १,५०० रुपये अनेक महिलांसाठी घरखर्चाचा मोठा आधार आहेत. किराणा, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांसाठी या पैशांचा उपयोग केला जातो.
दिवाळीच्या काळात घरखर्च वाढल्याने ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीजेला ओवाळणी म्हणून मिळेल, अशी आशा महिलांना होती. मात्र, सण संपला तरी पैसे जमा झाले नाहीत.
आता नोव्हेंबरही संपत आला आहे. दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार की स्वतंत्र, याबाबतही स्पष्टता नाही. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना रखडलेला हफ्ता मिळू शकतो. तर मग मंडळी पुढच्या महिन्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.





