Latest

शिक्षकांसाठी महत्वाची बातमी ! ‘टीईटी’ उत्तीर्ण बाबत दिला मोठा निर्णय

शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून हजारो शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. मंडळी, शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आता अधिक वेळ मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने टीईटी उत्तीर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य असल्याचा आपला पूर्वीचा निर्णय कायम ठेवला आहे. म्हणजेच सेवेत असलेल्या पात्र शिक्षकांना निर्धारित मुदतीत टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

पुनर्विचार याचिका फेटाळून लावत न्यायालयाने ही भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, जे शिक्षक ३१ ऑगस्ट २०२८ पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांना ही अट लागू होणार नाही. म्हणजे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याची गरज राहणार नाही.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या दोन्ही संस्थांकडून वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे शिक्षकांना वर्षातून तब्बल चार वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button