
मंडळी, शिर्डीच्या साईबाबांवरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात साई संस्थानला एकूण ६३८ कोटी रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. यामध्ये १९५ कोटी रुपये रोख स्वरूपात, तर १२२ कोटी रुपये ऑनलाईन, चेक आणि डीडीद्वारे जमा झाले आहेत.
याशिवाय भाविकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीही अर्पण केलं आहे. एका वर्षात तब्बल १५ किलोहून अधिक सोने आणि जवळपास २ लाख ग्रॅम चांदी साईचरणी अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे संस्थानला मुदत ठेवींवरील व्याजातूनच २५६ कोटी रुपये मिळाले आहेत.
दर्शन आणि आरती प्रवेशिकांमधूनही कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत रोख आणि ऑनलाईन देणगीत काहीशी घट झाली आहे.
तरीही साईभक्तांची श्रद्धा आणि दानाची परंपरा कायम मजबूत असल्याचं या आकडेवारीतून दिसून येत आहे. तर मग मंडळी तुम्ही शिर्डीला शेवटचं कधी गेलात ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





