Latest

गणपती बाप्पांचं रिद्धी-सिद्धीशी लग्न कसं झालं ? 99% भक्तांना माहिती नाही ही कथा

गणेशजी प्रथमपूज्य, बुद्धीचे देवता; पण त्यांच्या रूपामुळे अनेक राजे आपल्या कन्या देण्यास तयार नव्हते, अशी एक पौराणिक कथा सांगितली जाते. मंडळी, कथेनुसार कार्तिकेयाचे लग्न झाले आणि देवतांचीही लग्ने सुरू झाली. त्यामुळे गणेशजी नाराज झाले.

गणेशजींनी आपल्या मूषकाला आज्ञा केली की, जिथे देवतांचे लग्न होईल तिथे मंडपाच्या सजावटीची नासधूस करायची. त्यामुळे अनेक विवाहांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागले.

हा प्रकार थांबवण्यासाठी ब्रह्मदेवांनी आपल्या योगशक्तीतून रिद्धी आणि सिद्धी या दोन कन्या प्रकट केल्या. त्यांना गणेशजींकडून ज्ञान घेण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या प्रश्नांमध्ये गणेशजी इतके रमले की मूषकाला काम सांगायचं विसरले!

अखेर ब्रह्मदेवांनी रिद्धी-सिद्धीशी गणेशजींचा विवाह घडवून आणला. पुढे त्यांना शुभ आणि लाभ हे पुत्र झाले. म्हणूनच रिद्धी-सिद्धीसोबत शुभ-लाभाचेही पूजन केल्यास कामात विघ्न येत नाहीत, अशी श्रद्धा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button