
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीत यंदा ऐतिहासिक निकालाची नोंद झाली आहे. महायुतीचे उमेदवार आमदार अक्षय शिवाजीराव कर्डीले यांनी मोठी आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र अखेरपर्यंत दिसून आले.
मतमोजणीच्या चौदाव्या फेरीअखेर अक्षय कर्डीले यांनी तब्बल 66 हजार 107 मतांची भक्कम आघाडी घेतली होती. सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी कायम ठेवत विजयाची घोडदौड सुरू ठेवली आणि शेवटी विक्रमी मताधिक्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.
या निकालामुळे राहुरी तालुक्यासह नगर-पाथर्डी मतदारसंघात महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भावनिक लाट, स्थानिक पातळीवरील संघटनबळ, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि विकासाच्या मुद्द्यांवर मिळालेला पाठिंबा यामुळे हा विजय शक्य झाला आहे.





