
रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे.. आता तुम्हाला तीन महिन्यांचे रेशन एकाचवेळी मिळणार आहे. मंडळी, वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेची लाट लक्षात घेता राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना आता मे आणि जून महिन्यासाठी वेगळ्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
कारण या दोन्ही महिन्यांचा धान्य कोटा एप्रिलमध्येच एकत्र दिला जाणार आहे. म्हणजेच एप्रिल, मे आणि जून असे तीन महिन्यांचे रेशन एकाचवेळी मिळणार आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. अशा कडाक्याच्या उन्हात रेशनसाठी रांगेत उभं राहणं अनेकांसाठी त्रासदायक ठरत होतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी. हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला.
प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती १५ किलो धान्य मिळणार आहे. तर अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना प्रति कार्ड एकूण १०५ किलो धान्य दिलं जाणार आहे.
ई-पॉस मशीनद्वारेच वितरण होणार असून आधार प्रमाणीकरणासाठी अंगठ्याचा ठसा देणं बंधनकारक आहे. ज्यांचे ठसे उमटत नाहीत, त्यांच्यासाठी ओटीपीची सुविधा उपलब्ध असणार आहे. ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडीओ शेअर करा, लाईक करा..





