Latest

अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर….! ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला विक्रमी भाव

अहिल्यानगरमधून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ ऑक्टोबर रोजी कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे. येथे मंगळवारी कांद्याची तब्बल २७४७ गोणी आवक झाली.

विशेष म्हणजे विविध प्रतवारीच्या कांद्याला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कालच्या लिलावात येथे एक नंबर कांद्याला तब्बल ४६०० रुपयांपर्यंतचा कमाल दर मिळाला.

तर दोन नंबर कांद्याला २२०० ते ३४५०, तीन नंबर कांद्याला १००० ते २१५०, गोल्टी कांद्याला १५०० ते ३५०० आणि जोड कांद्याला ७०० ते १५०० रुपये दर मिळाला.

अवकाळी पाऊस, वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतीतील अडचणी असतानाही कांद्याला मिळालेला हा दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात आहे.

बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना कांद्याची योग्य प्रतवारी करून माल बाजारात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याला आणखी चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. राहाता बाजार समितीतील या दरामुळे कांदा उत्पादकांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button