Latest

गोदाकाठी हाहाकार ! धरणांमधून आवर्तन बंद, दहा लाख टन ऊस धोक्यात..

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आलीये. गोदावरी कालव्यांमधून शेतीसाठीचे आवर्तन बंद करण्यात आले असून, त्यामुळे राहाता, कोपरगाव, सिन्नर आणि वैजापूर परिसरातील तब्बल दहा लाख टन ऊस धोक्यात आलाय.

मंडळी, यंदा नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि जायकवाडी धरण पूर्ण भरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पाऊस लांबल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे.

अनेक विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. ऊस, फळबागा आणि इतर बारमाही पिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पाणीटंचाईही तीव्र होत चालली आहे. सध्या १४० गावे आणि ८१३ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शेतीसाठीचे पाणी आवर्तन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. अनधिकृत पाणी उपसा तातडीने थांबवण्याचे आदेश देत गरज पडल्यास अशा ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित केला जाणार आहे.

मंडळी, एकीकडे दहा लाख टन ऊस धोक्यात आहे, दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत आहे. आता येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button