Latest

मुलाला न्याय द्या, नाहीतर मला हत्यार द्या, मीच एन्काऊंटर करतो ! आकाश दुबय्याच्या वडीलांचा आक्रोश आणि बेग गँगवर गंभीर आरोप

“एका वडिलांच्या डोळ्यांसमोर मुलाची हत्या झाली… आणि आता त्यांचा आक्रोश संपूर्ण श्रीरामपूर हादरवत आहे !”
आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीविरोधातील संताप आणखी तीव्र झाला आहे.

बंदच्या चौथ्या दिवशी काढलेल्या आक्रोश मोर्चात आकाशचे वडील शेखर दुबय्या यांनी भावनिक भूमिका मांडली. त्यांनी आपल्या मुलाच्या हत्येसाठी काही व्यक्तींवर गंभीर आरोप करत, “दोषींवर कठोर कारवाई करा, नाहीतर मला हत्यार द्या,” अशी संतप्त मागणी केली.

तसेच शहरात अवैध धंद्यांमधून गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला. याच प्रकरणात सागर बेग यांनी यापूर्वी आपला या घटनेशी संबंध नसल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शेखर दुबय्या यांनी घटना घडल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार आपण आरोप करत असल्याचे सांगितले.

दरम्यान, शहरातील व्यापारी, नागरिक आणि विविध संघटना मोर्चात सहभागी झाल्या. अनेक शाळा, बाजारपेठा आणि पेट्रोलपंपही बंद ठेवण्यात आले. या प्रकरणात पुढे पोलिस आणि प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button