Latest

ओसाड माळरानावर पत्र्याच्या खोल्यात सुरु होती गर्भलिंग निदान चाचणी डाॅक्टरसह एजंटला केले गजाआड नगर जिल्ह्यात खळबळ

लोणी- पिंपरी निर्मळ रस्त्यावरील निळवंडे कालव्याजवळील एका शेतात राजरोसपणे गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती. ओसाड माळरानावरील दोन पत्र्यांच्या खोल्यात हा गंभीर प्रकार सुरु होता. अप्पर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांना या रॅकेटची माहिती मिळाल्यावर श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी गोपनिय पद्धतीने छापा टाकला.

या छाप्यात या दोन खोल्यात एक डाँक्टर व त्याच्या एजंट गर्भवती महिलांची तपासणी करताना आढळून आले. पोलिसांनी या खोल्यातून गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशिन, माॅनिटर, बँटरी, जेल, वैद्यकीय कागदपत्रे असे साहित्य जप्त केले.

लोणी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डाँ. स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून नेवासा येथील डाँ. राहुल भणगे, एजंट अभिजीत भुसाळ यांना अटक करण्यात आली.

नेवाशावरुन येऊन डाँ. भणगे हा पिंपरी निर्मळ परिसरात हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले. संबंधित गर्भवती महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button