Latest

बिबट्याची झुंज देत बापाने लेकीला वाचवले, पण धावपळीत खोल विहिरीत पडले..अहिल्यानगरमध्ये थरार

अहिल्यानगर जिल्ह्यात एक अंगावर काटा आणणारी घटना घडलीये. बिबट्याच्या जबड्यात अडकलेल्या आपल्या चार वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी एका बापाने स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. मुलीची सुटका करण्यात तो यशस्वी झाला, पण त्यानंतर घडलेल्या प्रकाराने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अवनी मनोज गुंजाळ ही चार वर्षांची चिमुकली तिच्या आईजवळ असताना बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. आईने आरडाओरडा सुरू केला. हा आवाज ऐकताच वडील मनोज गुंजाळ धावत घटनास्थळी पोहोचले.

पोरीला असे पाहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी थेट बिबट्याशी झुंज दिली. या थरारात बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलीची सुटका केली. मुलीला कडेवर घेऊन ते घराच्या दिशेने धावत सुटले. या धावपळीत त्यांना समोर असलेल्या खोल विहिरीचा अंदाजच आला नाही आणि दोघेही थेट विहिरीत कोसळले.

विहिरीत पडल्याचा आवाज आणि कुटुंबीयांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तातडीने मदतीला धावले. ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले.

बिबट्याच्या हल्ल्यात अवनी गंभीर जखमी झाली असून, विहिरीत पडल्यामुळे मनोज गुंजाळ यांनाही मोठी दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंडळी धाडसी बापासाठी एक लाईक तर बनतोच..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button