
शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता धान्याऐवजी मिळणाऱ्या अनुदान योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पण नेमका हा निर्णय कोणासाठी आणि कसा आहे? सांगतो. त्या आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यात समावेश नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
आतापर्यंत सरकारकडून मिळणारे पैसे आधी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा व्हायचे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जायचे. त्यामुळे अनेकदा पैसे मिळण्यास उशीर होत होता. मात्र आता ही मधली कडीच संपवण्यात आली आहे.
महाडीबीटी २.० प्रणालीद्वारे अनुदान थेट खात्यात जमा होणार आहे. सध्या प्रतिव्यक्ती दरमहा १७० रुपये दिले जातात. विशेष म्हणजे, किमान आधारभूत किमतीतील वाढीनुसार अनुदानातही सुधारणा केली जाणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला सरकारच्या या योजनेबद्दल काय वाटतं ? कमेंट करून नक्की सांगा.





