Explained

Explained : Ahilyanagar ZP | नगरच्या इतिहासातील जिल्हा परिषदेचे आत्तापर्यंतचे अध्यक्ष असे…

पूर्वीच्या अहमदनगर व आत्ताच्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेला मोठा इतिहास आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या याच जिल्हा परिषदेने अनेकांना पुढे आमदारही केले. नगर जिल्ह्याच्या राजकारणाचं विद्यापीठ म्हणून जिल्हा परिषदेला आजही ओळखलं जातं. अगदी अलिकडच्या काळाचं उदाहरण घ्यायचं झालं तर अकोल्याचे आ. डाँ. किरण लहामटे, पारनेरचे आ. काशिनाथ दाते हे जिल्हा परिषदेतूनच विधानसभेत पोहोचले. नगर जिल्हा परिषदेला 1962 सालापासूनचा इतिहास आहे. नगर जिल्हा परिषदेत सध्या 75 उमेदवार आहेत. याच नगर झेडपीत आत्तापर्यंत कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत…

नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं व 75 गटांचं आरक्षण नुकतंच जाहीर झालं. लवकरच या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षसाठी व सदस्यांसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. याच गदारोळात जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद किती महत्त्वाचं असतं, याच्याही चर्चा सुरु झाल्यात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद हे राज्यमंत्र्‍यांच्या दर्जाचं असून हाच लाल दिवा मिळविण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अहिल्यानगर जिल्हा परिषदेची स्थापना 2 मे 1961 साली झाली. परंतु तिच्या अध्यक्षपदाचा इतिहास हा 1992 सालापासून सांगितला जातो.

⦁ शंकरराव देवराम काळे हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ हा 12/08/1962 पासून 11/08/1967 पर्यंत होता.
⦁ त्यानंतर शंकरराव देवराम काळे हे पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. दुसऱ्यांदा 12/08/1967 पासून 11/08/1972 पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहिला.
⦁ सलग दोनदा अध्यक्ष राहिल्यानंतर रामनाथ लक्ष्मणराव वाघ हे जिल्हा परिषदेचे तिसरे अध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाळ हा 12/08/1972 पासून 19/06/1979 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर नेवाशाचे यशवंतराव कंकरराव गडाख यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. ते जिल्हा परिषदेचे चौथे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ हा 20/06/1979 पासून 26/11/1984 पर्यंत होता.
⦁ त्यानंतर ज्ञानदेव बाबुराव कासार यांनी प्रभारी म्हणून जिल्हा परिषदेचा कार्यभार हाकला. 27/11/1984 पासून 28/04/1985 असा सुमारे सहा महिने त्यांनी कारभार सांभाळला.
⦁ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन पाथर्डीचे आप्पासाहेब दादाबा राजळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांचा कार्यकाळ हा 29/04/1985 पासून 18/03/1990 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर ज्ञानदेव बाबुराव कासार हे पुन्हा प्रभारी म्हणून काम पाहू लागले. यावेळी प्रभारीपदाचा त्यांचा कार्यकाळ हा 19/03/1990 पासून 12/04/1990 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर बाबासाहेब निवृत्ती पवार हे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष झाले. त्यांचा कार्यकाळ हा 12/04/1990 पासून 30/06/1990 असा फक्त दोन महिन्यांचा राहिला.
⦁ त्यानंतर एस. जे. कुंटे यांनी जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून काम पाहिले. ते 01/07/1990 पासून 20/03/1992 पर्यंत प्रशासक होते.
⦁ त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेला नवा अध्यक्ष मिळाला. राहुरीचे अरुण पुंजाजी कडू पा. यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. ते 21/03/1992 पासून 20/03/1997 पर्यंत पाच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
⦁ त्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेला महिला अध्यक्ष लाभली. डॉ. विमल उत्तम ढेरे या 21/03/1997 पासून 20/03/1998 पर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
⦁ त्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आरक्षित राहिले. त्यावेळी अकोल्याच्या अशोक यशवंतराव भांगरे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. ते 21/03/1998 पासून 20/03/1999 पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले.
⦁ त्यानंतर शेवगावच्या नरेंद्र मारुतराव घुले पा. यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. ते जिल्हा परिषदेचे तेरावे अध्यक्ष झाले. त्यांचा कार्यकाळ हा 21/03/1999 पासून 16/08/1999 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर जिल्हा परिषदेचा पदभार हा पुन्हा प्रभारींकडे गेला. श्रीगोंद्याचे बाबासाहेब सहादू भोस हे झेडपीचे प्रभारी अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ 17/08/1999 पासून 28/10/1999 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर पुन्हा श्रीगोंद्याच्याच बाबासाहेब सहादू भोस यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभार गेला. ते जिल्हा परिषदेचे 15 वे अध्यक्ष झाले. यावेळी त्यांचा कार्यकाळ हा 29/10/1999 पासून 20/03/2002 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद पुन्हा आरक्षित झाले. त्यानंतर मिस्टर दादा शेलार यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. शेलार हे 21/03/2002 पासून 17/02/2005 पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले.
⦁ त्यानंतर राहुरीच्या बाबासाहेब लक्ष्मण भिटे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. ते 18/02/2005 पासून 20/03/2007 पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले.
⦁ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा महिलेला संधी मिळाली. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखेया जिल्हा परिषदेच्या 18 व्या अध्यक्षा झाल्या. त्यांचा कार्यकाळ हा 21/03/2007 पासून 20/03/2012 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर नेवाशाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव वकिलराव लंघे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. ते 21/03/2012 पासून 20/09/2014 पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले.
⦁ त्यानंतर पुन्हा महिलेला संधी मिळाली. कर्जतच्या मंजुषा राजेंद्र गुंड पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. त्यांचा कार्यकाळ हा 21/09/2014 पासून. 20/03/2017 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर पुन्हा एकदा विखे कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. शालिनी राधाकृष्ण विखे या दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्या. यावेळी त्यांचा कार्यकाळ हा 21/03/2017 पासून 30/12/2019 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर पुन्हा महिलेला जिल्हा परिषदेचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. शेवगावच्या राजश्रीताई चंद्रशेखर घुले या जिल्हा परिषदेच्या चौथ्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यांचा कार्यकाळ हा 31/12/2019 पासून 20/03/2022 पर्यंत राहिला.
⦁ त्यानंतर आत्तापर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासकच राहिला. संभाजी लांगोरे यांनी 21/03/2022 पासून 06/05/2022 पर्यंत प्रशासक म्हणून काम पाहिले.
⦁ त्यांच्यानंतर आशिष येरेकर हे 06/05/2022 पासून 26/05/2025 पर्यंत प्रशासक राहिले.
⦁ आता आनंद भंडारी हे 26/05/2025 पासून आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button