
उन्हाळा सुरू झाला की नारळ पाण्याची मागणी वाढते, पण अनेकदा आपण महागात नारळ घेतो आणि फोडल्यानंतर लक्षात येतं की त्यात पाणीच कमी आहे. मग जास्त पाणी असलेला नारळ कसा ओळखायचा? आज आपण काही सोप्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला जास्त पाणी असलेला नारळ हवा असेल, तर सर्वप्रथम त्याच्या आकाराकडे लक्ष द्या. शक्यतो गोल आकाराचा नारळ निवडा. अशा नारळांमध्ये पाणी जास्त असण्याची शक्यता असते.
दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे नारळ हलवून पाहणे. नारळ कानाजवळ धरून हलवल्यावर जर आत पाणी हलल्याचा स्पष्ट आवाज येत असेल, तर त्यात पाणी चांगल्या प्रमाणात असू शकतं. मात्र आतून खूप पोकळ आवाज येत असेल तर पाणी कमी असण्याची शक्यता असते.
तिसरी गोष्ट म्हणजे नारळाचे वजन. नारळ उचलल्यावर तो जड वाटत असेल, तर त्यात पाणी जास्त असण्याची शक्यता असते. हलके नारळ अनेकदा पाण्याऐवजी जास्त मलई किंवा खोबरे असलेले असू शकतात. म्हणून पुढच्या वेळी नारळ खरेदी करताना या छोट्या ट्रिक्स नक्की वापरा. त्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला नेमका हवा तसा नारळ निवडता येईल.





