
मंडळी, आता माझा बीपी नॉर्मल आहे, मग गोळी कशाला ? असा विचार तुम्हीही करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण बीपीची गोळी मनाने बंद करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते !
खरेतर, आजच्या धकाधकीच्या जीवनात उच्च रक्तदाब म्हणजेच बीपीची समस्या झपाट्याने वाढत आहे. एकदा बीपीची औषधे सुरू झाली की अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतील का?
तर, हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, बीपी नियंत्रणात आहे म्हणजे आजार पूर्णपणे बरा झाला असे नाही. अनेकदा औषधांमुळेच रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बंद करणे धोकादायक ठरू शकते. बीपी अचानक वाढल्यास हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे नुकसान आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
मात्र चांगली गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम, योग, संतुलित आहार, कमी मीठ, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे यामुळे रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. काही प्रकरणांमध्ये डॉक्टर औषधांचा डोस कमी करू शकतात. म्हणूनच, बीपीची गोळी स्वतःहून बंद करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा.





