Latest

नियतीने डाव साधला… सीना कालव्यात ट्रॅक्टर कोसळुन मायलेकींचा दुर्दैवी अंत ! कर्जतमध्ये नेमकं घडलं काय?

आई आणि मुलगी मिनी ट्रॅक्टरमधून प्रवास करत होत्या… पण काही क्षणांतच काळाने घाला घातला. ट्रॅक्टर थेट कालव्यात कोसळला आणि दोघींनाही जीव गमवावा लागला. नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या माहिजळगाव येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

करिष्मा अनिल जाधव (वय ३५) आणि त्यांची मुलगी अर्चना जाधव (वय १३) या दोघी मूळच्या बीड जिल्ह्यातील नाथापूर येथील रहिवासी होत्या. जाधव कुटुंब विहिरीच्या खोदकामासाठी माहिजळगाव परिसरात आले होते.

बुधवारी दोघी मिनी ट्रॅक्टरमधून माहिजळगाव चौक ते वाघमारे रस्त्याने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट सीना कालव्यात कोसळला.

दोघीही ट्रॅक्टरखाली अडकल्या. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने दोघींचाही मृत्यू झाला.
या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर मग मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button