Latest

तारीख ठरली ! लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार १५०० रुपये ?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, १७ सप्टेंबरपासून पात्र महिलांच्या खात्यावर पैसे टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात. विशेष म्हणजे, गौरी आगमनाच्या काळातच हा निधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख महिलांना मिळत आहे. मात्र, ऑगस्टच्या हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

जर २० सप्टेंबरपर्यंत पैसे जमा झाले नाहीत, तरी महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सूत्रांनुसार, सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून ३ हजार रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

आता गौरी आगमनाआधी १५०० रुपये मिळणार की दोन महिन्यांचा हप्ता एकत्र येणार, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button