Latest

डोळ्यांसमोर पिकं करपली…शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी विखे पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ! पालकमंत्र्यांचा जामखेड दौरा

महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील जवळपास 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अहिल्यानगरमधील सर्वच तालुके दुष्काळ यादीत आहेत आणि राज्यातील सर्व मंत्री आता पाहणी दौरे करत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा पाहणी दौऱ्यावर आहेत. मंडळी, जामखेड तालुक्यातील अरणगाव परिसरात पावसाअभावी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.

पावसाची प्रतीक्षा करूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट ओढावले आहे. शेतातील पिकांची अवस्था, झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याची पाहणी विखे पाटील यांनी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे, मदतीची प्रक्रिया आणि शासनाकडून मिळणाऱ्या संभाव्य दिलास्याबाबतही प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली. आता या पाहणीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मदत मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button