Latest

कांद्यावरील बुरशीला गोमूत्र अन् ताकाचा रामबाण उपाय ! अहिल्यानगरमधील विद्यार्थिनीचे मोठे संशोधन

कांदा पिकावरील बुरशीजन्य रोगांवर आता नैसर्गिक उपाय सापडलाय आणि तोही एका विद्यार्थिनीच्या संशोधनातून ! मंडळी, कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. पण बुरशीजन्य रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते.

रासायनिक औषधांवर खर्च वाढतो आणि जमिनीचा पोतही बिघडतो. याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी पारनेर येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थिनी राणी शेख यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांनी ‘कांदा पिकावरील बुरशीजन्य रोग आणि त्यांचे नियंत्रण’ या विषयावर अभ्यास केला. त्यांनी रासायनिक औषधांऐवजी नैसर्गिक उपायांवर भर दिला.

विविध वनस्पतींचे अर्क, गायीचे गोमूत्र आणि ताक यांचा वापर करून प्रयोग करण्यात आले आणि या प्रयोगांमधून बुरशीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, हे सिद्ध झाले. म्हणजेच, आता शेतकऱ्यांना महागडी रासायनिक औषधे वापरण्याची गरज कमी होऊ शकते. पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.

विशेष म्हणजे हे संशोधन केवळ महाविद्यालयापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रकाशित झाले आहे. तुम्हाला काय वाटत ? कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button