Latest

ताशी ५० किमी वेगाचे वारे , गारपीठ.. २१,२२ एप्रिलला अहिल्यानगरला मोठा अलर्ट..

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी पाऊस, जोरदार वारे आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 20, 21 आणि 22 एप्रिलला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 एप्रिलसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ अशा 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 22 एप्रिलला जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. मंडळी, हवामानाचा हा अचानक बदल शेतीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button