Latest

गॅस नाही… रॉकेलही नाही… मग नागरिकांनी करायचं तरी काय ? सरकारचा निर्णय झाला… पण रॉकेल अजूनही गायब का?

एकीकडे गॅसचा तुटवडा अजूनही नागरिकांना भेडसावत आहे, तर दुसरीकडे या समस्येवर उपाय म्हणून सरकारने रॉकेल वितरणाचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, जिल्हानिहाय प्रत्यक्ष वितरणाची सुरुवात अद्याप झालेली नाही.

इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅस सिलिंडरची कमतरता जाणवली. त्यानंतर शासनाने पर्याय म्हणून केरोसीन वाटपाचे आदेश दिले. जिल्हा आणि तालुका स्तरावर कोटा निश्चित करण्यात आला, तसेच कोणत्या ठिकाणाहून रॉकेल उचलायचे याचेही नियोजन करण्यात आले. तरीही या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

तत्कालीन उपाय म्हणून केरोसीनचा पर्याय देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात ना दुकानदारांकडे त्याचा पुरवठा दिसला, ना ग्राहकांकडून त्याबाबत विशेष मागणी झाली. त्यामुळे केरोसीनची गरज कमी होती की पुरवठाच झाला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासनाकडून पुरवठा झाल्याचे स्पष्ट संकेत नसताना, ग्राहकांकडूनही त्याबाबत विचारणा होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत केरोसीन कुठ हरवल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.केरोसीन वितरणाचा निर्णय कागदावर राहिल्याचे चित्र आहे. नगरकर तुम्हाला काय वाटत केरोसीन नेमकं गायब कुठे झालं ? कॉमेंट करा तुमचं मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button