Latest

यंदा कापूस इतिहास घडवणार…अहिल्यानगरच्या या मार्केटमध्ये कापसाला ९ हजारांचा भाव ! पण तरीही शेतकरी अडचणीत, कारण काय ?

दिवाळीच्या तोंडावर कापसाला अहिल्यानगरच्या काही बाजारांमध्ये ९ हजार रुपये भाव मिळतोय, पण तरीही शेतकऱ्यांना कपाशीचे पीक परवडत नाहीये. कारण काय ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, नेवासा तालुक्यातील घोडेगावात सध्या कापूस खरेदीला वेग आला आहे. दिवाळी जवळ आल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, यंदा अनियमित पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

दुसरीकडे बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पाण्याचा खर्च वाढलाय. त्यामुळे ९ हजारांचा भाव मिळूनही शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसे उरत नाहीत.

दिवाळीसाठी मुलांचे नवीन कपडे, घरातील किराणा, फराळ आणि शेतीची उधारी भागवायची आहे. त्यामुळे कापूस विकून आलेल्या पैशांत कोणता खर्च करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

आता शेतकऱ्यांची मागणी आहे की, सरकारने उत्पादनातील घट आणि नुकसानीचे मूल्यमापन करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. तर मग मंडळी, तुमच्या भागात कपाशी पिकाची काय स्थिती आहे? कमेंट करून नक्की सांगा !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button