
तुमचं रेशन कार्ड सुरू आहे, पण अचानक धान्य मिळणं बंद झालं तर? शेवगाव तालुक्यात तब्बल ६ हजार ३४५ शिधापत्रिकाधारकांचा धान्यपुरवठा बंद करण्यात आला आहे. पण नेमकं कारण काय? सांगतो, त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, शासनाच्या मिशन सुधार योजनेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, धान्य न उचलणारे लाभार्थी, आर्थिक उलाढाल आणि कंपनीतील संचालकपद अशा निकषांवर तपासणी झाली.
विशेष म्हणजे भूमी अभिलेख, कृषी विभाग, आरटीओ आणि आयकर विभागाच्या नोंदींचीही पडताळणी करण्यात आली. मात्र, धान्य बंद झालं म्हणजे रेशन कार्ड रद्द झालं असं नाही.
पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पुरवठा विभागाकडे आपली पात्रता तपासून घ्यावी. तर मग मंडळी तुम्हाला रेशनकार्डवर धान्याचा लाभ मिळतोय का? कमेंट करून नक्की सांगा.





