
लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यात गेल्या तीन महिन्यांपासून पैसे आलेले नाहीत… आता चर्चा सुरू आहे की सरकार एकत्र ₹४५०० जमा करणार… पण खरंच असं होणार का? पाहा पूर्ण अपडेट…
राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मार्च, एप्रिल आणि आता मे महिना सुरू होऊनही लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ते जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकत्रित तीन महिन्यांचे ४५०० रुपये मिळणार का, की टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकत्रित तीन महिन्यांचा हप्ता म्हणून ४५०० रुपये मिळतील का, की फक्त मार्च-एप्रिलचा ३००० किंवा एका महिन्याचा १५०० रुपये जमा होतील, याबाबत सस्पेन्स कायम आहे. राज्यातील लाखो महिला आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लावून आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा





