
Ladki Bahin Yojana अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते… पण आता या योजनेत मोठी कारवाई सुरू झाली आहे.लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे कारण दरमहा आता सरकारने अपात्र लाभार्थ्यांवर थेट कारवाई सुरू केली आहे.
KYC प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे समोर आले असून त्यामुळे आता त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत वसूल केले जात आहेत. राज्यात सुमारे 12,915 लाभार्थी अपात्र ठरले असून त्यापैकी 6,457 महिलांकडून जवळपास 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
विशेष म्हणजे 2,652 सरकारी कर्मचाऱ्यांचाही यात समावेश असून नियमांनुसार त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची परवानगी नव्हती.
महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पुढील काळात आणखी कडक कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना मिळालेले पैसे परत करावे लागू शकतात.





