Latest

मोठी बातमी : महाराष्ट्र सरकार साईबाबांच्या नगरीत उभारणार खास मॉल ! शिर्डीत ‘या’ ठिकाणी विकसित होणार 20 कोटींचा भव्य प्रकल्प

ग्रामीण महिलांच्या कष्टाला आता हक्काची बाजारपेठ मिळणार आहे ! अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो महिला बचतगटांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महिला बचतगटांनी तयार केलेले पापड, लोणची, मसाले, डाळी, सेंद्रिय उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तू आता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत. यासाठी राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार आहे.

विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल ३१ हजार बचतगट या अभियानाशी जोडलेले आहेत. त्यांच्या उत्पादनांना या मॉलमुळे नवीन बाजारपेठ मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.

या प्रकल्पासाठी प्रत्येक मॉलवर सुमारे २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मॉलमध्ये विक्री केंद्रासोबतच महिलांसाठी प्रशिक्षण आणि संवादाची स्वतंत्र सुविधाही असेल.

दरम्यान, अहिल्यानगरच्या उमेद मॉलसाठी शिर्डीत जागेची पाहणी सुरू असून, जिल्हा परिषदेने साई संस्थानाकडे जागेचा प्रस्ताव दिला आहे.

मंजुरी मिळाल्यास शिर्डीत हा मॉल उभा राहणार आहे. त्यामुळे महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button