
दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! पीएम किसानचा २ हजारांचा हप्ता मिळाल्यानंतर आता सरकारकडून आणखी ५ हजार रुपये मिळणार असून यासंदर्भात नवीन अपडेट समोर आलीये. नेमकी काय आहे नवीन अपडेट? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयात पोहोचली असून सध्या तिची पडताळणी सुरू आहे. बातमीनुसार, २ नोव्हेंबरपासून म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मदतवाटप सुरू होण्याची शक्यता आहे.
मात्र, आधारशी जोडलेल्या बँक खात्यातच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का, हे तहसील कार्यालयात तपासा. तर मग मंडळी तुम्हाला ही मदत मिळाली तर काय करणार ? कमेंट करून नक्की सांगा!





