Latest

मोठी बातमी : नेवाशाच्या व्यवसायिकाची फसवणूक प्रकरणी भोंदू अशोक खरातला पुन्हा अटक; नेमक प्रकरण काय?

दैवी मंत्र, पुखराज रत्न आणि व्यवसायात भरभराटीचं आमिष… अशा गोष्टी सांगून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भोंदू अशोक खरात पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात गेला आहे.

राज्यभर चर्चेत असलेल्या अशोक खरात याला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीच्या एका नव्या गुन्ह्यात अटक केली. विशेष म्हणजे, ही कारवाई न्यायालयाकडून ताबा घेतल्यानंतर करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील एका कापड व्यावसायिकाने खरातविरोधात तक्रार दाखल केली होती. व्यवसायाची भरभराट व्हावी यासाठी दैवी मंत्र टाकून पुखराज रत्न सोन्याच्या अंगठीत बसवून देण्याचे आमिष त्याने दाखवल्याचा आरोप आहे.

यासाठी संबंधित व्यावसायिकाकडून प्रत्येकी २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, या अंगठ्यांचा अपहार केल्याचा आरोप खरातवर करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या तपासातून आणखी काय समोर येणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button