Latest

मोठी बातमी ! बांधकाम कामगारांच्या मुलांना सरकारकडून मिळणार ‘या’ ४९ वस्तू; कसा आहे शासन निर्णय ?

बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे ! आता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा संच मिळणार आहे. या योजनेला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलीय. नेमका कोणाला आणि काय लाभ मिळणार? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राबवली जाणार आहे. यामध्ये नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या संचात एक-दोन नाही तर तब्बल ४९ वस्तूंचा समावेश आहे. यात शाळेची बॅग, पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, कंपास, रंगपेटी, सोलर लॅम्प, अभ्यास टेबल आणि इतर शैक्षणिक साहित्य मिळणार आहे.

या निर्णयाची माहिती श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली. नक्कीच या योजनेमुळे कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला शासनाची ही नवीन योजना कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button