Latest

बिग ब्रेकिंग ! ‘या’ पुढे नो पेट्रोल; गाड्या फक्त इथेनॉलवरच धावणार; मारुतीने कारही आणली..

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये. भविष्यात गाड्या पेट्रोलवर नव्हे, तर थेट इथेनॉलवर धावणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलीये.

मंडळी, नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, शंभर टक्के इथेनॉल वापरासंदर्भातील फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मारुती कंपनीने १०० टक्के इथेनॉलवर चालणारी पहिली कार तयार केली असून, लवकरच इतर वाहन कंपन्याही अशा गाड्या आणि दुचाकी बाजारात आणणार आहेत.

गडकरी यांनी सांगितले की, एमजी हेक्टर आणि टोयोटासारख्या मोठ्या कंपन्याही १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सादर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी काळात वाहन क्षेत्रात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. तसेच इथेनॉलबाबत सुरू असलेल्या अपप्रचारावरबाबत स्पष्ट केले की, इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असून त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल.

याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाही होणार आहे, कारण ऊस आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला मोठी मागणी निर्माण होईल.

मंडळी, जर १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर बाजारात आली, तर वाहन क्षेत्रात आणि इंधन बाजारात मोठी क्रांती घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुमचं काय मत आहे? कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button